Friday, 8 July 2016

Learning science through innovation

आदर्श प्रशाला, नागज. 
सांगली जिल्हयातील दुष्काळी कवठे महांकाल तालुक्यातील नागज गावातील आदर्श प्रशाला, नागज. ही एक माध्यमिक शाळा आहे. या शाळेमध्ये आय.बी.टी विषय सुरु आहे. 
 उपक्रम /कार्यशाळा :- Learning Science Through Innovation at IISER,Pune
विज्ञान आश्रम व आयसर यांच्या तर्फे दि.०४-०७ -२०१६ ते ०८ -०७-२०१६ या पाच दिवसांच्या कार्यशाळेसाठी आम्ही पुण्यामध्ये आलो.येथे आम्ही विज्ञान विषयी प्रकल्प तयार करणार आहोत.ज्यामध्ये आय.बी. टी विषयाचा वापर करून प्रकल्प तयार करणार आहोत.जो समाज उपयोगी असेल व तसाच विज्ञान प्रदर्शनात दाखवता येईल.

प्रकल्प निवड :-
या कार्यशाळेच्या दुसर्या दिवशी आम्ही शेती, ऊर्जा आणि पर्यावरण या विषयातील आमच्या गावात असणार्या समस्या आणि त्यावरील उपायावर कल्पना विस्फोट या उपक्रमामध्ये आम्ही अभ्यास केला आणि त्यानुसार  खाली दिलेला उपक्रम करावयाचे ठरविले आहे .    


 प्रकल्पाचे नाव: 
आदर्श प्रशाला ,नागज शाळेभोवती , वर्ग खोलीतील व सभोवतालच्या परिसरातील कागद ,प्लास्टिक यांचे निर्मूलन करणे.
  उद्देश :- 
१)शाळेतील मुले-मुली वहीचे कागद ,खाऊचे प्लास्टिकचे कागद ,रिकामे पेन्स व बाटल्या शाळेच्या परिसरात टाकतात. आणि यामुळे कचरा निर्माण होतो. 
2)निर्माण होणारा कचरा ही एक शाळेची समस्या आहे .
 नियोजन :
१)वर्गखोलीतील बाहेरील कागदी कागद ,खाऊचे प्लास्टिक कागद ,रिकामे पेन्स व बाटल्या हे वेगवेगळ्या ठिकाणी गोळा करणे.
२)कागदी कागद ,चुरगाळलेले  कागद आहे असे करून त्याचे गट्ठे तयार करणे.
३) कागदाचे गठ्ठे प्रत्येक दिवसाची नोंद करून ठेवणार.
४)शाळेत व वर्गखोलीत निर्माण होणारा सुका कचरा हे एका ठिकाणी गोळा करून त्याचे वजन करू व त्या प्रत्येक दिवसाची नोंद ठेऊ . 






No comments:

Post a Comment